PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 26 MAY 2022 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 26 मे 2022

  • 192.82 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 15,414
  • Active cases stand at 0.04%
  • Recovery Rate currently at 98.75%
  • 2,167 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,26,04,881
  • 2,628 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.58%)
  • Weekly Positivity Rate (0.51%)
  • 84.84 cr Total Tests conducted so far; 4,52,580 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                 #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 192.82 कोटींहून अधिक (1,92,82,03,555) मात्रांचा टप्पा पार केला. 2,43,56,591 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 3.33 कोटींहून अधिक (3,33,02,653) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 15,414 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा  दर 98.75%  इतका आहे.  गेल्या 24 तासांत 2,167 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,04,881. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,628  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,52,580 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.84 कोटी (84,84,11,356) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.51% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  0.58%. नोंदविण्यात आला आहे.

इतर अपडेट्स :

 

 

S.Kulkarni/P.Malandkar

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1828559) Visitor Counter : 115